पुण्यातील शिवसेनेला ताकद देणार :- उदय सामंत यांचे पुणे जिल्ह्याच्या संवाद बैठकीत भाष्य

पुणे :- शिवसेनेची ताकद पुण्यात वाढविण्यासाठी पुण्यातल्या शिवसैनिकांना व शिवसेनेला ताकद देणार असल्याचे भाष्य राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. ते शिवसेनेच्या पुणे शहर व पुणे ग्रामीण संवाद बैठक प्रसंगी पुणे येथे बोलत होते. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व इतकं महान आहे कि, त्यांच्या कर्तृत्वावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता शिवसेनेवर भरभरून प्रेम करणार असून शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मतांचं भरभरून दानही देणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. यावेळी विधानपरिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार रवींद्र धंगेकर सर्व शिवसेना, युवासेना आणि सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पुणे जिल्ह्याने खूप प्रेम केले. पुणे हे राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर पण पुणे जिल्ह्याने भरभरून प्रेम केले आहे. पुण्यात आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना माझ्या माध्यमातून सर्वोतपरी ताकद देण्याचे काम करण्यात येईल असे आश्वासन यावेळी सामंत यांनी दिले. संघटनात्मक पातळीवर सर्वानी मनापासून काम करून संघटना घराघरात पोहचविण्यासाठी काम करावे असे आवाहन सामंत यांनी केले.शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे हात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मजबूत करण्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे असे आवाहन करून शिंदे साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या योजनांची माहिती सर्वत्र पोहचविण्यासाठी सर्वांनी काम सुरु करावे असेही सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button