
रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांना ४ महिने पगार नाही
जिल्ह्यातील ४५४ कंत्राटी शिक्षकांना नोकरीला लागल्यापासून अर्थात गेल्या चार महिन्यांपासून अद्याप एकदाही मानधन मिळालेले नाही. शिक्षक अशा परिस्थितीमध्ये पदरमोड करून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. पुढील तीन दिवसात मानधन न दिल्यास २८ मार्चपासून जि.प. कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा डीएड, बीएडधारक कंत्राटी शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सुदर्शन मोहिते यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्हा परिषदेकडे मानधनासाठी पैसे असून सुद्धा शिक्षण विभाग वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप या कंत्राटी शिक्षकांनी केला आहे. कंत्राटी शिक्षकांबाबत शिक्षण विभागाला कसलंच सोयरसुतक नाही. शिक्षण विभागाने आता या विषयात चक्क मार्गदर्शन मागविले आहे. यासंदर्भात संघटनेच्यावतीने जि.प. प्रशासनाला निवेदन देवून त्याद्वारे कैफियत मांडण्यात आली.www.konkantoday.com