
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना पकडले
ऐपतीचा दाखला देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणार्या सावंतवाडी तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिकाला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कुडाळ शाखेच्या पथकाने रंगेहाथ सापळा रचून पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. पुरुषोत्तम कृष्णा वारंग ( रा. तुळसुली-कुडाळ) असे या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेत उशिरापर्यंत तहसील कार्यालयात चौकशी सुरू होती.
www.konkantoday.com