
चिपळूण शहरातील पॉवर हाऊस परिसरातील वृद्धाची आत्महत्या.
चिपळूण शहरातील पॉवर हाऊस परिसरातील एका वयोवृद्धाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ही आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली हे स्पष्ट झालेले नाही. राम काशिनाथ पाटणकर (६०, पॉवर हाऊस) अशी आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याची खबर नेनेश वसंत तांबडे (३९, पॉवर हाऊस) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम पाटणकर हे पॉवर हाऊस परिसरात राहत असून त्यांच्या राहत्या घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पाटणकर यांनी कोणत्या कारणातून ही आत्महत्या केली याचा उलगडा झालेला नाही.www.konkantoday.com