
लघु उद्योजकांसाठी आरक्षित जागेत सर्कस, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांचा आक्षेप.
नगर परिषदेने स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावरील जागा लघु उद्योगांसाठी आरक्षित केली असताना ही जागा शहरात येवू घातलेल्या सर्कससाठी भाड्याने देण्यात आली आहे. त्यामुळे सदरची आरक्षित जागा बाहेरून आलेल्या सर्कस चालकास भाड्याने कशी देण्यात आली, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी उपस्थित केला.यासंदर्भात त्यांनी सांगितले की, बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही.
म्हणून त्यांना रोजगार मिळावा यासाठी चिपळूण नगरपरिषदेने बहाद्दूरशेख नाका येथे लघु उद्योगांसाठी जागा आरक्षित केली. या जागेबाबत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून लघु उद्योगांसाठी जागा भाड्याने उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न करता हा प्रकल्प गेली अनेक वर्षे पडून आहे.www.konkantoday.com