रत्नागिरी जिल्ह्यात आरटीईच्या रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रारंभ

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात इ. १ लीसाठी एकूण १२ हजार ३३६ विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या २ हजार ४३१ शाळांमध्ये या प्रवेश प्रक्रियेला २ मंगळवार १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला असून ही प्रवेश प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत चालणार असल्याचे जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी सांगितले.आरटीई २५ टक्के अंतर्गत मोफत शाळा प्रवेश २०२४-२५ साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर आरटीई पोर्टल/ऑनलाईन ऍप्लिकेशन या टॅबमध्ये सुरू झाली आहे. जिल्ह्यात २ हजार ४३१ शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. यावर्षी इंग्रजी माध्यम शाळांव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. गतवर्षी २०२३-२४ मध्ये ९३६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button