
चिपळूण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण वर्ग
चिपळूण : सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या वतीने चिपळूण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी २९, ३० आणि ३१ मार्च या कालावधीत सकाळी ६.३० ते १० यावेळेत चिपळूण परिसरात तीन दिवसीय पक्षी निरीक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरात ज्येष्ठ पक्षीमित्र भाऊ काटदरे आणि नितीन नार्वेकर हे मार्गदर्शन करणार असून, पक्ष्यांची तोंडओळख, त्यांचे आवाज, सवयी आणि अधिवासाचा अभ्यास यांविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.
तसेच पक्षी निरीक्षण करताना कॅमेरा, दुर्बीण आणि सिटीझन सायन्स तंत्रज्ञानाची ओळख व वापर केला जाणार असून, युवा निसर्ग अभ्यासकांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव असणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क असून, मर्यादित जागा आहेत. अधिक माहितीसाठी सोहम घोरपडे (७५५८२६८७८१) यांच्याशी संपर्क साधावा. या शिबिरानंतरही इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षणाची नियमित सत्रे घेतली जातील.
गुगल फॉर्म लिंकसाठी येथे क्लिक करावे https://forms.gleVYr6UkqVLdJ71BTB6