श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्ती


विधानसभेत श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्तीगुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात आता शिंदे गटाने नवी खेळी खेळली आहे. श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीत विपुल कदम यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर होते. मात्र, रामदास कदमांच्या विरोधामुळे राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, विधानसभेत राजेश बेंडल यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आता गुहागर मतदारसंघात शिवसेनेच्या पुर्नबांधणीसाठी शिंदेगटाकडून भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात नवी खेळी खेळली जात असल्याचं बोललं जातंय. विपुल कदम गुहागर विधानसभा मतदार संघात सक्रिय आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button