
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण वाढले.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी किनार्यावर यावर्षी कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या किनार्यावर कासव संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून नुकतीच टप्याटप्याने आतापर्यंत ९०३ कासवाच्या पिल्लांनी समुद्रात मार्गक्रमण केले आहे. यावर्षी गावखडी समुद्र किनार्यावर मोठ्या प्रमाणात कासवांच्या अंड्यांची घरटी सापडत आहेत. ती संरक्षित करण्यात आली आहेत. या संरक्षित घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे.
गावखडी किनार्यावर कासवांची अंडी घालण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्यामुळे या किनार्यावर कासव संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे येथे येणार्या अनेक पर्यटकांना पिल्ले समुद्रात जातानाच क्षण अनुभवायला मिळत आहे. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या उपस्थितीत पर्यटकांच्या साक्षीने कासवाची पिल्ले नुकतीच किनार्यावरील घरट्यातून समुद्रात मार्गस्थ करण्यात आली. या पिल्लांनी काही वेळातच समुद्राच्या पाण्यात प्रवेश केला.www.konkantoday.com