
कृती समितीचा लढा पालकमंत्री व जनतेविरोधी नाही, वाटद एमआयडीसी संघर्ष दलालांविरोधात
वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीचा हा लढा पालकमंत्री आणि जनतेमध्ये नाही. हा लढा प्रशासनाने राबवलेली धोरणे आणि मंत्र्यांच्या भोवती राहून सर्वसामान्य जनतेच्या जमिनी कवडीमोल भावात लुटणार्या दलालांविरोधात आहे. येत्या काळात हा लढा अधिक तीव्र होणार आहे, असा इशारा अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी दिला आहे. संघर्ष समिती पुढील आठ दिवसांत बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गावणकर यांनी पालकमंत्र्यांना आजूबाजूला पाहण्याचे आवाहन करत, जेएसडब्ल्यू आल्यापासून या व्यक्तींनी फक्त लोकांना विकण्याचे काम कसे केले आहे, हे पाहण्यास सांगितले. काही मंत्र्यांच्या समर्थकांनी एमओयूडीसीबाधित क्षेत्रातील बनावट खरेदीखत प्रकरणात कारावास भोगल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावरून रत्नागिरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वाटद भूसंपादनावरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटला आहे.www.konkantoday.com