कोकण रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड. ; ११ गाड्यांना फटका

. या मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्या ठिक ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या.कोकण रेल्वे मार्गावर ही घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने साडेतीन तासानंतर यामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम ही मंगला एक्सप्रेस वेरवली येथे आली असता गाडीचा पॅन्टोग्राफ हा ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तारेमध्ये अडकून ती तुटल्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघड निर्माण झाला. यामुळे त्रिवेंद्रम ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस तसेच मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह एकूण ११ गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button