
निवळी-जयगड रस्त्याचे होणार चौपदरीकरण; ना. सामंत यांचा ना. गडकरींकडे पाठपुरावा
रत्नागिरी : निवळी-जयगड या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. लवकरच याचे चौपदरीकरण केले जाणार असल्याची माहिती ना. गडकरी यांनी ना. सामंत यांना दिल्ली भेटीदरम्यान दिली. बुधवारी दिल्ली येथना. गडकरी यांची भेट घेतली. यावेळी निवळी – जयगड रस्त्याच्या कामाची पूर्तता लवकरच होणार असल्याचा शब्द ना. गडकरी यांनी उदय सामंत यांना दिला. हा रस्ता चौपदरी झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असे ना. सामंत यांनी ना. गडकरींना सांगितले.निवळी – जयगड रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होणार असून वाहतूक कोंडीस आळा बसणार
आहे. बंदराला रस्ते वाहतुकीने जोडण्यासाठीहा रस्ता महत्त्वपूर्ण आहे.