
समाज जर म्हणाला तर ताकदीनं राजकारणात उतरणार, तेव्हा मला हलक्यात घ्यायचं नाही-मनोज जरांगे पाटील
लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये देखील घडामोडींना वेग आला आहे. रात्री उशिरा अचानक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.या भेटीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. समाज जर म्हणाला तर इतक्या ताकदीनं राजकारणात उतरणार, तेव्हा मला हलक्यात घ्यायचं नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या तीस तारखेला आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
समाज जर म्हणाला तर इतक्या ताकदीनं राजकारणात उतरणात. मग मला आंदोलनात जसं हलक्यात घेतलं होतं तसं राजकारणात घ्यायचं नाही, असं मोठं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रात्री उशीरा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अकोल्यातून आंबेडकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यातच महाविकास आघाडीसोबतच्या प्रस्तावावरही ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र त्याआधी आंबेडकर यांनी रात्री उशीरा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
www.konkantoday.com