
देवरूख मातृ मंदिर येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार.
देवरूख येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार आहे. मातृमंदिर आणि चाळके किडनी फाउंडेशन यांच्या सहकार्याने अत्यल्प दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.रविवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता या सेंटरचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होईल. स्व. इंदिराबाई हळबे यांनी १९५४ साली दोन कॉटच्या साह्याने सुरू केलेले मातृमंदिर हॉस्पिटल आता डायलिसिस सेंटरचे नवे दालन सुरू करत आहे.
तालुक्यात डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना उपचार देणारी डायलिसिस यंत्रणा येथे नसल्याने येथील रुग्णांना रत्नागिरी अथवा चिपळूण येथे जावे लागत होते. परिणामी, डायलिसिस खर्चापेक्षा वाहतूक आणि वेळ अधिक खर्च होतो. या परिसरातील डायलिसिस सेंटरच्या नितांत गरजेचा विचार करून मातृमंदिरने चाळके किडनी फाउंडेशनच्या सहकार्याने हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे एकावेळी दोन मशिन कार्यरत राहणार आहेत.