
मुलुंड परिसरातील एका निवासी गृहनिर्माण संस्थेत घुसलेल्या नऊ फूट लांबीच्या मगरीची रविवारी सुटका.
मुलुंड परिसरातील एका निवासी गृहनिर्माण संस्थेत घुसलेल्या नऊ फूट लांबीच्या मगरीची रविवारी सुटका करण्यात आली. मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत ही घटना आज रविवारी सकाळी घडली. या सोसायटीतील नागरिकांना सोसायटीत भली मोठी मगर घुसल्याचे दिसले. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. आढळलेल्या मगरीला वनविभागाने आणि रेस्क्यू पथकाने पकडले असून तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.वन्यजीव कल्याण गटाच्या अधिकाऱ्याने या बाबत पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरच्या (रॉडब्ल्यू) सदस्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने रविवारी सकाळी या सोसायतीतून मगरीला ताब्यात घेत तिला सुरक्षित स्थळी हलवलं आहे.