
रत्नागिरी जिल्हा परिषदेत यंदा तिसऱ्यांदा पदाधिकाऱयांविना सन 2025-26 चा अर्थंसंकल्प सादर.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत यंदा तिसऱयांदा पदाधिकाऱयांविना सन 2025-26 चा अर्थंसंकल्प सादर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदाया केवळ स्वताया उत्पन्नाााs व खर्चाचे सन 2024-25 चे अंतिम सुधारित व सन 2025-26 चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सन 2024-25 चे अंतिम सुधारित महसुली जमा रक्कम सुमारे 20 कोटी 38 हजार एवढी वाढ घेवून सुमारे 37 कोटी 78 लाख 66 हजार महसूली खर्चाच्या अंदाजपत्रकाला प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली.हे अंदाजपत्रक गुरूवारी 20 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. त्यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, मुख्य व लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी तसेच वित्त विभागांतर्गत अर्थसंकल्प शाखांतील अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय कारभार सुरु आहे. जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आपले स्वतचे आर्थिक बजेट सादर केले जाते. सन 2025-24 या आर्थिक वर्षासाठीचा जिल्हा परिषद स्व उत्पन्नाचा अर्थसंकल्प सादर होण्याची प्रतिक्षा सर्वांना लागली होती. पदाधिकाऱयांविना यंदाही हा अर्थसंकल्प सादर झाला आहे.