
चवदार तळे सत्याग्रहाच्या कार्यक्रमासाठी महाड येथे आलेल्या पुणे येथील एका भीमसैनिकाचा किल्ले रायगडावरील एका बुरुजावरून पडून मृत्यू
चवदार तळे सत्याग्रहाच्या कार्यक्रमासाठी महाड येथे आलेल्या पुणे येथील एका भीमसैनिकाचा किल्ले रायगडावरील एका बुरुजावरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.भीमराव अडकूजी घायवान (वय. ६४, रा. तुपे, पुणे) असे या मृताचे नाव आहेत. आज चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन होता. त्या निमित्ताने ते महाडमध्ये आले होते. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते किल्ले रायगड पाहण्यासाठी गेले असता फोटो काढताना तेथील एका बुरुजावरून पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक कार्यवाही सुरू आहे.