
मित्रानेच केला घात! मृतदेह पोत्यात भरून टाकला रायगड जिल्ह्यात, एक डायरी.. एक नंबर आणि म्हसळा पोलिसांनी १२ तासात लावला खूनाचा तपास
सोमवारी सायंकाळी म्हसळा पोलिसांना एक शव पोत्यात भरून टाकल्याचा संशय असल्याच्या कॉल आला. यावेळ म्हसळा पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी एक ४० ते ४५ वर्षाच्या अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत शव आढळून आला.साबळे हा छोटे मोठे रस्त्याचे कामे घेत असून लेबर पुरवण्याचे काम करतो.पोलिसांनी तत्काळ साबळे याला घटनेची माहिती देत पोलिस ठाण्यात बोलावले मात्र साबळे यांनी पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली.
मात्र म्हसळा पोलिसांनी रात्रीच तत्काळ आपली सूत्र हलवत रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथील साबळेच्या साइट वरून दोन कामगारांना अटक केली. या दोन आरोपींची कसून चौकशी केल्या नंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत होळीच्या वादात हा खून केल्याचा म्हटला आहे. मात्र या घटनेची माहिती या आरोपींनी मालक साबळे याला दिल्यानंतर साबळे यांनी मृतदेह पोत्यात भरून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत टाकण्यास सांगितले.विभागीय अधिकारी सविता गर्जे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप काहाले, उप पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवले, संतोष चव्हाण , सागर चितारे,विघ्ने, स्वप्नील निळेकर यांच्या पथकाने आरोपी संतोष साबळे रा. कोंडा पंचतन, विशाल देवरुखकर रा. गुहागर, श्यामलाल मौर्य रा . उत्तर प्रदेश अशा आरोपींच्या घटनेची माहिती मिळता १२ तास आत मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या आहेत