
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे मालवाहू रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या.
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी रेल्वे कॉलनीजवळील रेल्वे रूळावर तरूणाने मालवाहू रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी ७४५ वाजण्याच्या सुमारास घडली. बसुराज शरणाप्पा कुडगी (३८, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहू ट्रेन व्हीईएन बीसीएन ही १५ मार्च रोजी निवसर ते रत्नागिरी रेल्वे स्टेशन अशी येत होती. सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास ही गाडी जात असताना बसुराज याने ट्रेनखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.www.konkantoday.com