
कोतळूक उमदेवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमान मंदिरात हनुमंत जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
११ एप्रिल रोजी सकाळी अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा, स्थानिक भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी ३ ते ५ महिलांचा चे हळदी-कुंकू समारंभ, रात्री ८.३० वाजता अंजनीमाता महिला मंडळ कोतळूक उदमेवाडी यांचे भजन होईल. रात्री १०.३० वाजता दशरथ राणे लिखित, दिनेश बागकर दिग्दर्शित श्री हनुमान नाट्य मंडळ कोतळूक उदमेवाडी मधील स्थानिक कलाकारांचा “यंदा कर्तव्य आहे” हा दोन अंकी विनोदी नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.
१२ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता स्थानिक भजनाचा कार्यक्रम होईल. सकाळी ६.२५ वाजता श्रींचा जन्मसोहळा, दुपारी १.३० वाजता हभप पद्माकर नारायण जोशी (वरवडे, रत्नागिरी) यांचे कीर्तन होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता खास आकर्षणासहीत श्रींची पालखीतून सवाद्य मिरवणूक निघेल. रात्री ९.४५ वाजता गुणवंतांचा सत्कार, रात्री १०.३० वाजता केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली, संगमेश्वर यांचे बहुरंगी नमन गण, गौळण, वगनाट्य सादर केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना कोतळूक गावातील आणि पंचक्रोशीतील भक्तगणांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष समीर मुकुंद ओक, महिला अध्यक्ष मेघा महेश महाडिक आणि सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.