
रत्नागिरी जिल्ह्यात तापमान वाढले पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची पाठ.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीतील गणपतीपूळे, दापोली, गुहागर यासारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते.अनेक पर्यटक जिल्ह्यात येत असल्याने येथील व्यावसाय वाढीमध्ये भर पडलेली दिसून येते. मात्र जिल्ह्यातील तापमान वाढीचा फटका येथील व्यावसायाना बसू लागला आहे. तसेच पर्यटकांची संख्या रोडावल्याने जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेली सलग दोन दिवस उष्णतेचा पारा ३८ ते ४० अंशावर गेल्याने पर्यटकांसह व सर्वसामान्य लोकांना देखील घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.जिल्ह्यातील दापोली, गुहागर याबरोबर रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर परिसर व समुद्र चौपाटी परिसरात पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे