
दापोली तालुक्यातील मुरूडमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या
दापोली तालुक्यातील मुरूड येथील नेत्रा निलेश बोवणे या १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नमिता बोवणे यांची मुलगी नेत्रा १२ रोजी घरी होती. नमिता यांचे दीर दिनेश बोवणे घरी आले असता नेत ओढणीच्या सहाय्याने वाशाला टांगून गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. त्यांनी इतरांना बोलावून तातडीने तिला शासकीय दवाखान्यात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याबाबत दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.www.konkantoday.com