
खेड तालुक्यातील भरणे ते रेल्वे स्टेशन महामार्गावर विरूद्ध दिशेचा प्रवास ठरतोय वाहनधारकांसाठी जीवघेणा
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी झाला, पण या मार्गावरील सर्व्हिस रोड धोकादायक बनला असून योग्य वाहतूक नियमन होत नसल्याने खेड तालुक्यातील भरणे ते रेल्वे स्टेशन मार्गे वेरळ खोपी फाटा या भागात अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दापोलीकडून येणारे गौण खनिज वाहतूक करणारे ट्रक व अन्य लहान-मोठी वाहने उलट्या दिशेने महामार्गावर जात असल्याने कोणत्याही क्षणी भीषण अपघात होवून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्व्हिस रोड बनवताना अनेक त्रुटी राहिल्याने व या भागात वाहतूक पोलीस किंवा कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने या भागातील प्रवास धोकादायक बनला आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.www.konkantoday.com