
लांजा तालुक्यातील आरगांव येथे बिबट्या चक्क हनुमान मंदिरात शिरला.
सध्या लांजा तालुक्यात बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागल्याच्या घटना सुरू असतानाच सोमवारी १० मार्च रोजी तालुक्यातील आरगाव येथे एक बिबट्या चक्क हनुमान मंदिरात शिरल्याची घटना घडली. स्थानिक युवकांनी हा प्रकार आपल्या कॅमेर्यात कैद केला आहे.आरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मानवी वस्तीत दिसून आला आहे. अशातच १० मार्च रोजी रात्री ८.३० च्या सुमारास बिबट्या आरगाव वरीलवाडी येथील हनुमान मंदिरात शिरला होता. हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही तरूणांनी पाहिला. यानंतर त्यांची हबेलहंडी उडाली.
मात्र त्यानंतर हा बिबट्या मंदिरात शिरून पुन्हा जंगलाकडे पळाला. बिबट्याच्या मानवी वस्ती व मंदिरात शिरण्याच्या प्रकारामुळे आरगाव वरीलवाडी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरगाव ग्रामपंचायत सरपंच शमिका खामकर यांनी या बाबतची माहिती लांजा येथील वनविभागाला दिली असून येथे पिंजरा लावावा व बिबट्याला पिंजरा बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.www.konkantoday.com