रत्नागिरी शहरात मारूती मंदिर येथे अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी झाला. विजय सुनील शेट्ये (४४, रा. शीळ, कदमवाडी, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी विजय यांनी शहर पोलिसांत अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांकडून दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय शेट्ये हे १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास रस्ता ओलांडत होते. यावेळी दुचाकीस्वाराने त्यांना जोराची ठोकर दिली. या अपघातात विजय शेट्ये यांना दुखापत झाली. अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरूद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button