
महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण.
भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) मंदिर उभारले गेले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा 17 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.या निमित्ताने 14 ते 17 मार्च या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्यासह विविध मंत्री, आमदार, खासदार तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.