
दापोलीतील अग्रगण्य श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार
दापोलीतील अग्रगण्य असलेल्या श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला या वर्षीचा दीपस्तंभ पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे यांचे तर्फे कोकण विभागातून ५०ते १००कोटी ठेवी या गटातून पहिला क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर तलाठी व हेमंत कळेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार देताना अनेक अनेक निकष तपासले जातात असे संस्था करीत असलेले सामाजिक व अन्य काम तसेच कामकाजात आधुनिक तंत्रज्ञाचा केलेला वापर व सभासदांसाठी केलेले काम याचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो या संस्थेचे अध्यक्ष सुधीर तलाठी असून राकेश कोटीया हे उपाध्यक्ष आहेत संस्थेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com