
चिपळुणातील मच्छिमार्केटसह भाजी मंडई खुली होण्याचा मार्ग मोकळा.
गेल्या २० वर्षापासुन बंद असलेल्या मच्छी-मटण मार्केटसह भाजी मंडई आता खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी रत्नागिरी येथे झालेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत यातील गाळे ३० वर्षासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर नापरतावा असणारी अनामत रक्कम व भाडेही कमी राहणार आहे. यापूर्वी या रक्कमा मोठ्या असल्याने व्यावसायिक लिलावात सहभाग घेत नव्हते.
याचबरोबर पवन तलाव मैदान इमारत व गोवळकोट धक्का येथील कॅन्टीनही ३० वर्षासाठीच दिले जाणार आहे.२० वर्षापूर्वी मच्छि-मटण व भाजी मंडईच्या पूर्वीच्या इमारती पाडून त्या जागी नव्या इमारती बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. मात्र त्यानंतर त्यात राजकारण शिरल्याने हे दोन्ही प्रकल्प आजतागायत सर्व सोयी सुविधायुक्त पूर्ण होवू शकले नाहीत.www.konkantoday.com