
खेड शहरातील युवतीचा विनयभंग व ब्लॅकमेलचा प्रकार, तरूणास अटक.
खेड शहरातील एका २८ वर्षीय युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील प्रतिक संजय शिंदे (२४) यास येथील पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता संशयिताची ३ दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.ही घटना ऑक्टोबर २०२३ ते १० मार्च २०२५ या कालावधीत घडल्याचे पीडित युवतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
२ वर्षापूर्वी युवतीची संशयिताशी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर इन्स्ट्राग्रामवर मॅसेजद्वारे बोलणे सुरू झाले. २०२३ च्या नवरात्रौत्सवात दोघांची खेडमध्ये प्रत्यक्ष भेटही झाली. मार्च २०२४ मध्ये दोघे लाडघर येेथेफिरायलाही गेले होते. यानंतर व्हॉटसऍप व्हिडिओ कॉलर वेळोवेळी बोलणे सुरू असताना अश्लिल शब्द वापरत विनयभंग केला. संशयिताशी व्हॉटसऍपद्वारे चॅटींग व व्हिडिओ कॉलवर बोलायचे युवतीने कमी केल्यानंतर तिचा अश्लिल फोटो व्हॉटसऍपवर स्टेटसला ठेवत बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जातीवाचक शिवीगाळ करत ब्लॅकमेल केल्याचेही पीडित युवतीने पोलीस ठाण्यात नोंदवलयानंतर तरूणास पोलिसांनी अटक केली.www.konkantoday.com