लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीने महिलांसाठी आयोजित केलेल्या उन्नती २०२५ जल्लोषात साजरा

. जागतिक महिला दिनानिमित्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीने महिलांसाठी आयोजित केलेल्या उन्नती २०२५ जल्लोष अभिजात मराठी भाषेचा या विशेष लोककला समूह स्पर्धेत हातखंबा बोंबलेवाडी येथील राणी जिजामाता समुहाने प्रथम क्रमांक पटकावला तर कर्ला आंबेशेत येथील रणरागिणी समूह द्वितीय आणि पोमेंडी बाणेवाडी येथील महालक्ष्मी समूल तिसर्‍या क्रमांकाचे मानकरी ठरले.अभिजात मराठी भाषेचा अविभाज्य घटक असलेल्या पारंपारिक लोककला स्पर्धेत प्राधान्य देण्यात आले होते. यात एकूण आठ महिला समूहांनी सहभाग घेतला होता. शहरातील माळनाका येथील देसाई बँक्वेट हॉल येथे ही स्पर्धा पार पडली.पारंपारिक लोककलांचे जतन व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि लोककलांचे सादरीकरण नव्या पिढीसमोर व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ५०० हून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. पारितोषिक वितरण अमेय ज्वेलर्सचे अमेय वीरकर व स्नेहा वीरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेी कला दिग्दर्शिका निदा शेख, लोकमान्य सोसायटीच्या मार्केटींग मॅनेजर सारिका कुलकर्णी, पत्रकार विभा कदम उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून मराठी भाषेसंदर्भात भरीव कामगिरी करणार्‍या प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असणार्‍या विनया परब यांनी परीक्षण केले. या कार्यक्रमासाठी अमेय ज्वेलर्स, श्री प्रॉडक्टस, राजेंद्र ज्वेलर्स, वृक्षवल्ली तसेच उदयराज साऊंड सर्व्हिसेस, ओम साई डेकोरेटर्स, राघव एंटरप्रायझेस आदींचे प्रायोजकत्व लाभले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button