
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत साहित्याला भीषण आग.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील आल्ड्रफ केमिकल्सच्या नावे असलेल्या प्लॉटमधील साहित्याला लागलेल्या आगीत हिदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे लाखांचे साहित्य जळून खाक झाले. रविवारी दुपारी २ च्या सुमारास ही आग लागली. दीड तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समोर आले नाही.
औद्योगिक विकास महामंडळाकडून एका व्यक्तीने अल्ड्रफ केमिकल्सच्या नावाने काही एकराचा प्लॉट विकत घेतला होता. हा फ्लॉट सदर मालकाने हिंदुस्थान युनिलिव्हर नामक कारखान्याला साहित्य ठेवण्यासाठी भाडेतत्वावर दिला होता.www.konkantoday.com