
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल.
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पृथ्वीराज पाटील असे आरोपीचे नाव असून डॉ. डी.वाय.पाटील यांचे ते नातूही आहेत.कापूरबावडी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करून तिला गर्भापात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप आहे.
ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या २९ वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. ठाणे, नवी मुंबई आणि प्रामुख्याने पाटील यांच्या कोल्हापुरातील बंगल्यावर हे प्रकार घडले.अनेक वेळा तिच्यावर हल्ला देखील करण्यात आला. धमाकावून तिला कोल्हापुरात गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप करत पीडितेने कापुरबावाडी पोलिस ठाण्यात ७ मार्च २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.