
चिपळूण-पनवेल या मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी.
पनवेल-चिपळूण अनारक्षित मेमू गाडी सोडण्याची उदघोषणा शिमगा उत्सवासाठी करण्यात आली असली तरी त्याच्या वेळापत्रकावरून चाकरमान्यांमध्ये स्पष्टपणे नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण स्टेशनवर तिसर्या फलाटाची निर्मिती झाली असल्याने येथून चिपळूण-पनवेल या मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची मागणी जोर पकडत आहे.कोकण रेल्वेचा मार्ग कात टाकतोय, लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. पनवेल ते वीर मार्गाचे दुपदरीकरण काम झाले आहे. याचजोडीने रेल्वे स्थानकांवर अद्ययावत सुविधा, सौंदर्यीकरण अशा सार्यासह नवा साज देण्याचे काम मुख्य स्थानकांवर पूर्ण झाले आहे. रेल्वे स्थानकांवर त्यामुळे कोकण दिसू लागले आहे.
यासार्या पार्श्वभूमीवर ़एक पॅसेंजर गाडी जी हक्काची म्हणावी पण त्यात हंगाम वगळता प्रवेश मिळणेदेखील कठीण जात आहे. यामुळे चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, या पाच तालुक्यातील प्रवाशांची मोठी कुचंबणा होते. यामुळे या पाच तालुक्यातील जनमानसात याविरूद्ध तीव्र असंतोष आहे.www.konkantoday.com