
गणेशोत्सवात अहमदाबाद- सावंतवाडीपर्यंत धावणार चार गणपती स्पेशल गाडय़ा
कोकण रेल्वे मार्गावर गणेश भक्तांच्या सेवेसाठी आतापर्यंत दीडशेहून अधिक फेरा जाहीर झालेल्या असताना प्रथमच अहमदाबादहून थेट सावंतवाडीपर्यंत चार नवीन गणपती स्पेशल गाडय़ा २७ ऑगस्टपासून सोडण्यात येणार असल्याचे शनिवारी रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.या गाड्यांमुळे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील चकारमान्यांसाठी गणेश उत्सवातील प्रवास सोयीचा होणार आहे.