जिल्हा शासकीय रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी, तब्बल नऊ किलोचा ट्यूमर काढण्यात यश.

रत्नागिरी -अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया महानगरासह मोठ्या खासगी रुग्णालयात होतात.यासाठी रूग्णांना लाखो रुपये मोजावे लागतात.परंतु रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात एक अवघड शस्त्रक्रिया पार पडली.एका महिलेच्या पोटातून तब्बल साडेनऊ किलोचा गर्भाशयाचा ट्यूमर बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजिक कचरे येथिल शीला दत्ताराम हळदणकर वय ३५ या पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या.सुमारे सात वर्ष पोटात असलेली गाठ दिवसेन दिवस वाढत होती.त्यामुळे त्या अधिक तपासासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या.तेथे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तज्ञ डॉक्टरांनी घेतला.ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉक्टर विनोद सांगवीकर यांनी यशस्वी केली.ही शस्त्रक्रिया तब्बल दोन तास चालली व या शस्त्रक्रियेनंतर तब्बल साडेनऊ किलोचा गर्भाशयाचा ट्यूमर बाहेर काढण्यात आला.जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमच निवडीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली.यापूर्वी जास्ती जास्त एक ते दोन किलो पर्यंतचे गाठ काढण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button