
मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटीत ट्रक पलटल्याने चालक जखमी.
वेरळ (ता. लांजा) उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाल करण्यात आले आहे. लोकेश राम सोनकर (वय २४, रा. उत्तरप्रदेश) असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास वेरळघाटी उतारात घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकेश सोनकर हा ट्रकमध्ये पेपरचा कच्चा माल घेऊन गुजरातहून गोवा राज्याकडे जात होता. वेरळ घाटीत आला असता ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.