
महावितरणने साजरा केला लाईनमन दिवस.
कोकण परिमंडळ रत्नागिरी येथे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या अध्यक्षतेखाली लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.जनमित्रांनी सुरक्षेसंदर्भात व वसुलीसंदर्भात करावयाच्या कृतीबाबत मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित जनमित्र यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला वैभव पाथोडे, राजश्री मोरे, नितीन पळसुले देसाई, दत्तात्रय साळी, प्रणाली निमजे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन बाळकृष्ण झोरे यांनी केले. रत्नागिरी विभागातील उपविभागीय अधिकारी व शाखा अभियंता, जवळपास ८० जनमित्र कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधान तंत्रज्ञ वाघाटे यांनी ३५ वर्षाच्या दीर्घसेवेबद्दल मनोगत व्यक्त केले.