
मनमोहक सोनेरी ‘देवाचा मासा’ संवर्धनासाठी तेजस ठाकरे यांची संवर्धन मोहीम
सिंधुदुर्गमधील आंबोलीच्या हिरण्यकेशी येथे आढळणारा मनमोहक सोनेरी ‘देवाचा मासा’ संवर्धनासाठी तेजस ठाकरे यांनी संवर्धन मोहीम सुरू केली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी तेजस ठाकरे आपल्या सहकाऱयांसह सिंधुदुर्गात गावकऱयांमध्ये माहितीपत्रके वाटून देवाच्या माशाचे महत्त्व पटवून देत आहेत. ‘वाचवूया देवाचो मासो’ मोहिमेंतर्गत त्यांनी राज्याच्या वन सचिवांनाही पत्र दिले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱया आंबोलीला हजारो पर्यटकांची पहिली पसंती असते. या ठिकाणाहून अगदी काही अंतरावर असणाऱया हिरण्यकेशीला प्रत्येकाची भेट ही ठरलेलीच. इथल्या महादेव मंदिराजवळ हिरण्यकेशी नदीच्या मुखामध्ये दुर्मिळ असा सोनेरी रंगाचा ‘देवाचा मासा’ सापडतो.
www.konkantoday.com