कोकणच्या चविष्ट उत्पादकतेला ना. उदय सामंत ह्यांची भेट!


आज लघु उद्योग वसाहत, खालची आळी, रत्नागिरी येथे ‘योजक फुड्स अ‍ॅण्ड बेव्हरेजेस प्रा. लि.’ या स्थानिक उद्योग समूहास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भेट दिली.

यावेळी चिवडा, चकली, लाडू, कोकणातील प्रसिद्ध आंबावडी, अळूवडी यांसारखी १६० उत्पादने हे समूह तयार करतो. या दर्जेदार उत्पादनांची मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पाहणी केली आणि उत्पादक प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.
नाना भिडेंची पुढची पिढी अतिशय सक्षमपणे ‘योजक’ समूहाचे नेतृत्व करत असून, महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करत आहे. कोकणची उत्पादने उत्कृष्ट दर्जाची कशी असू शकतात, हे योजक समूहाने आज प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे.
कोकणातील उद्योजक आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठीही सज्ज झाले आहेत, असे मत यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केले.
तसेच MIDC अंतर्गत येणाऱ्या एअरपोर्ट परिसरात कोकणातील उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ‘योजक’ समूहाकडून असल्यास, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button