
होळीसाठी चिपळूणकरिता ८ डब्यांच्या मेमू लोकलसह तीन विशेष गाड्या.
मुंबई आणि गोवा दरम्यान होळीकरिता प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या विशेष गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांची माहिती अशी : गाडी क्रमांक 01102 / 01101 मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी १५ आणि २२ मार्च रोजी मडगाव येथून सकाळी ८ वाजता सुटून संध्याकाळी साडेपाच वाजता पनवेलला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01101 पनवेलहून त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेसात वाजता पोहोचेल. ही गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण येथे थांबेल. गाडीला २० एलएचबी डबे असतील त्यात AC 2 टियर (१), AC 3 टियर (३), AC 3 टियर इकॉनॉमी (२), स्लीपर (८), जनरल (४), जनरेटर कार (१), SLR (१) अशी रचना असेल.
२) गाडी क्रमांक 01104 / 01103
मडगाव – लोकमान्य टिळक आणि परतीची साप्ताहिक विशेष गाडी १६ आणि २३ मार्च रोजी मडगाव येथून संध्याकाळी साडेचार वाजता हॉटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी (क्र. 01103) १७ आणि २४ मार्च रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणित्याच दिवशी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी मडगावला पोहोचेल. ही गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे येथे थांबेल. गाडीला २० एलएचबी डबे असतील. त्यात AC 2 टियर (१), AC 3 टियर (३), AC 3 टियर इकॉनॉमी (२), स्लीपर (८), जनरल (४), जनरेटर कार (१), SLR (१) अशी डब्यांची रचना असेल.
३) गाडी क्रमांक 01018 / 01017
चिपळूण – पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष गाडी १३ ते १६ मार्च या कालावधीत दररोज दुपारी तीन वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि पनवेल येथे रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात पनवेल – चिपळूण गाडी (क्र. 01017) त्याच दिवशी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता चिपळूणला पोहोचेल. ही गाडी आयनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण येथे थांबेल. गाडीला आठ डबे असतील