
मंडणगड-घुमरी शाळेचे छप्पर कोसळून 2 लाखांचे नुकताच
मंडणगड : तालुक्यात रविवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळा घुमरी या शाळेचे छत कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घुमरी या गावी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे 9 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निसर्ग चक्रीवादळात या शाळेचे नुकसान झाले होते. त्या वेळेपासून शाळेतील विद्यार्थी गेली दोन वर्ष गावातील चावडीमध्ये शिक्षण घेत आहेत. रविवारी झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे शाळेवरील छत कोसळले आहे.