
वेरळ स्कूलमध्ये १० रोजी ‘तिमिरातूनी तेजाकडे’ मैफल
खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयातील मुलांच्या ‘ तिमिरातूनी तेजाकडे ‘ या अनोख्या संगीतमय मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. जे दृष्टिहीन आहेत तरीही ते आपल्या जीवनात दृष्टीपलिकडे आनंद देण्यासाठी श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात येत आहेत. विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या साक्षीने अंध विद्यार्थ्यांची अनोखी मैफल रंगणार आहे. या मैफलीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयश पाष्टे यांनी केले आहे.