
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी मधील ‘दीक्षांत समारंभ’ स्थगित
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मधून मार्च २०२५ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन शनिवार दि. ०८ मार्च २०२५ सकाळी ११: 00 वाजता राधाबाई शेट्ये सभागृहात करण्यात आले होते. परंतु मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनुसार सदर पदवीदान समारंभ संस्थगित करण्यात आला आहे. पदवीदान समारंभाची नवीन तारीख निश्चित झाल्यावर जाहीर करण्यात येईल.
संबंधित विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.