
वाळू उत्खनन बंद, वाळूअभावी घरकुले रखडणार.
चार महिन्यात मंजुरी मिळालेली घरकुले पूर्ण करावीत, अशी अट लाभार्थ्यांना घालण्यात आली आहे. मात्र सध्या वाळू उत्खनन बंद आहे. वाळू मिळत नसल्याने घराची कामे हाती कशी घ्यावीत, अशा विवंचनेत लाभार्थी पडले आहेत. वाळू मिळत नसल्याने हे लाभार्थी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने लवकरात लवकर रत्नागिरी जिल्ह्यात वाळू उपलब्ध करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भारत लब्धे यांनी केली आहे.www.konkantoday.com