
दापोली नगर पंचायतीने उभारलेली नवीन मच्छिमार्केट इमारत उदघाटनाच्या प्रतीक्षेत
दापोली नगर पंचायतीकडून उभारण्यात आलेली आणि गेले काही वर्ष शुभारंभाच्या प्रतीक्षेत असलेली मच्छी, मटण, चिकन, भाजपाला विक्रीसाठी असलेली नवीन इमारत उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
या इमारतीची सारी कामे पूर्ण आहेत. त्यामुळे या इमारतीत जाण्यासाठी मच्छी, चिकन, मटण, भाजीपाला व्यावसायिकांची दानपंकडून बैठक घेण्यात आली. परंतु या बैठकीचा मात्र काही परिणाम या व्यावसायिकांवर फार झाला नाही. एकंदरीत मासळी विक्रेते या इमारतीत जाण्यास तयार नसल्याचे समोर आले. तर मटण, चिकन विक्रेते या इमारतीत तयार असल्याचे बोलले जात आहे.www.konkantoday.com