
वाकेड घाटात कंटेनर पलटी होऊन दोघे गंभीर जखमी, कंटेनर जळून खाक.
मुंबई- गोवा महामार्गावरील वाकेड घाटात कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत कंटेनर जळून खाक झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजता झाला.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनर वाकेड घाटातील अवघड वळणावर पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या ड्रायव्हर आणि क्लिनरला कंटेनरमधून बाहेर काढले.
दरम्यान कंटेनरला आग लागली असता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग ठेकेदार, राजापूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण लागलेल्या भीषण आगीत कंटेनर जळून खाक झाला.