
एकाच दिवशी मोर्चे काढण्याचा भूमिकेवर एकता भूमिकन्या समिती ठाम
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ २० जुलै रोजी मोर्चा निघणार असून या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एकता भूमिकन्या समितीनेही त्याच दिवशी मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
समर्थन करणाऱ्या लोकांना उद्योगीकरण मधून आपली भूमी प्रदूषित करायची आहे.त्या मुठभर लोकांनी रत्नागिरीत प्रकल्प उभारावा.ज्या मूठभर लोकांना हा प्रकल्प पाहिजे आहे त्यातील बहुतेक लोक वृद्ध आहेत. या उलट ज्या लोकांना प्रकल्प नको आहे त्यामध्ये तरुणांचा भरणा असल्याचेही या समितीने सांगितले . २०जुलैच्या समर्थनाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही नाणार वासीय हजारोंच्या संख्येने रत्नागिरीत येऊन प्रति मोर्चा काढू त्यातून उदभवणाऱ्या परिस्थितीला पोलिस जबाबदार असतील असे त्यांनी सांगितले . या पत्रकार परिषदेला नाणार विरोधी संघर्ष समितीचे सचिव नितीन जठार, सदस्य मंगेश चव्हाण ,सत्यजित चव्हाण, संजय राणे एकता भूमी समितीच्या शेवंता माेडे ,सोनाली ठकरुल उपस्थित होते.
www.konkantoday.com