
सायकलिस्ट क्लबतर्फे वीर सावरकरांना रॅलीतून अभिवादन.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी बुधवारी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरगाव गायवाडी येथे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खोलीला भेट देण्यात आली. या दोन्ही अपक्रमांना क्लबमधील सायकलस्वारांचा उत्तम प्रतिसाद लाभला.अंदमानातून सुटका झाल्यानंतर कोणत्याही सक्रीय राजकारणात भाग घ्यायचा नाही, या बंधनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीत राजकीय बंदिवान म्हणून आणण्यात आले.
परंतु प्लेगची साथ आल्यामुळे सावरकरांना शिरगांव, गायवाडी येथील लोकमान्य टिळकांचे अनुयायी (कै.) विष्णूपंत काशिनाथ दामले यांनी शिरगावात बोलावले. दामले यांच्या घरी धान्याचे कोठार असलेली खोली पाचव्या पिढीनेही जतन करून ठेवली असून नोव्हेंबर २०२४ मध्ये या खोलीला शंभर वर्षे पूर्ण झाली. या खोलीत सावरकरांची लेखणी, दिवा, हस्तक्षराची प्रत आजही जतन करून ठेवण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती प्रसन्न दामले व रविंद्र दामले यांनी यावेळी सायकलिस्टना दिली.www.konkantoday.com