
गुलदारचा ताबा महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे, सिंधुदुर्गात पर्यटनाचे नवे दालन निर्माण होणार.
हिंदुस्थानच्या नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटन विकासासाठी मिळणार आहे. या युद्धनौकेवर समुद्राच्या आत मालवणच्या वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रिफसाठी याचा वापर होणार आहे. ही युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित झाली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सुर्यवंशी यांनी दिली.भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित व्हावी यासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन विकास मंत्री शुंभुराजे देसाई, तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ही युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित झाली आहे.
समुद्राच्या पाण्याखाली ठेवण्यात येत असलेल्या या युद्धनौकेचे ग्रामीण स्कुब डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे. मालवणच्या वेंगुर्लाजवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझीयम आणि आर्टिफिशियल रिफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मागितली होती. यासंबंधीचा करार करण्यात आला असून भारतीय नौदलाने कारवार नौदलतळ येथे पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली असल्याची माहिती मनोज कुमार सुर्यवंशी यांनी दिली.www.konkantoday.com