
शासनाच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांचा कामगिरीवर जाण्यास नकार.
रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांनीही कामगिरीवर जाण्यास नकार दिला आहे. जिल्हा डी.एड., बी.एड. बेरोजगार संघटनेने निवेदन देवून काम करण्यास नकार दिला आहे.रत्नागिरी जिल्हा कंत्राटी शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार डी.एड., बी.एड. धारकांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत स्थानिक शिक्षक मिळाले होते. शासनाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.www.konkantoday.com